Ad will apear here
Next
झुणका भाकर खा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा!
1

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी स्वदेशी आहार हा दुहेरी लाभ असलेला उपाय आहे. झुणका भाकर, नारळाच पाणी, उसाचा रस, लिंबू पाणी, फळांचा रस, नाचणी-ज्वारी-बाजरीची भाकरी, कांदा, काकडी असे भारतीय शेतकऱ्यांनी पिकवलेले पदार्थ सेवन केले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रत्येक भारतीय हातभार लावू शकतो. असे पदार्थ खाणे हा दुहेरी लाभाचा उपाय आहे. कारण या पदार्थांचे उत्पादक भारतीय शेतकरी आहेत. आपण हे पदार्थ विकत घेतले तर त्याचे अंतिम लाभार्थी सामान्य शेतकरी असतात. शिवाय हे पदार्थ पचवण्यासाठी सोपे असतात. ह्या पदार्थांमध्ये पुरेश्या प्रमाणात फायबर असतं. आपलं आतडं पोटात आलेला पदार्थ शोषण्याचं काम करतं. मिक्सर सारखं दळण्याचं काम करत नाही. शेतात पिकलेले पदार्थ पाण्यासह पोटात येतात तेव्हा ते शोषून घेणं आतड्यांना सोपं पडतं.
लठ्ठपणा, डायबेटीस, हृदय विकार होण्याची भीती नसते. म्हणजे अस्सल भारतीय पदार्थ सेवन केल्यामुळे दुहेरी लाभ होतो. शेतकऱ्यांच्या मालाला मागणी येते आणि ते पदार्थ खाणाऱ्यांना आरोग्य जपता येतं. पण पिझ्झा, बर्गर, नुडल्स आणि विदेशी पदार्थ व कोल्ड-ड्रिंक्स दुहेरी नुकसान करतात. पहिलं नुकसान म्हणजे त्यांचा लाभ विदेशी कंपन्यांना होतो. जरी त्यांनी भारतीय शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेतला तरी त्यापोटी ते शेतकऱ्याला खूप कमी पैसे देतात. शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण करून त्यांना जास्त नफा कमावता येतो. शिवाय विदेशी पदार्थ पचवण्यासाठी कठीण असतात. त्यांचं पोषण मुल्य जवळ जवळ शुन्य असतं आणि ते अनेक आजारांना आमंत्रण देतात.
म्हणजे भारतीय शेतकऱ्याचं नुकसान आणि आपलंही नुकसान. फायदा मात्र विदेशी कंपनीचा! त्या फायद्यातील खूप मोठा वाटा भारतात गुंतवला जात नाही. म्हणजे भारतीय ग्राहकांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारी विदेशी कंपनी देशाचं नुकसान करते... आज नवश्रीमंन्तांकडे आलेला पैसा विदेशी खाद्य पदार्थांवर खर्च होतो. म्हणून भारतात खूप संपत्ती असूनही शेतकरी आत्महत्या करतात. संपत्तीचा मोठा वाटा विदेशी कंपन्यांकडे जातो. भारतीय शेतकऱ्यांना लाभ होत नाही. पिकाच्या लागवडी इतकी किंमत मिळत नाही. त्याचवेळेस पिझ्झा, बर्गर, नुडल्स आणि कोल्ड-ड्रिंक्स विकणाऱ्या विदेशी कंपन्या प्रचंड लाभ कमावतात. एका कोल्ड-ड्रिंक्स विकणाऱ्या कंपनीने काही वर्षांपूर्वी भारतात मिळणार नारळ पाणी आणि लिंबू पाणी हे आपल्यासमोरील संकट आहे. जर सामान्य भारतीय नारळ पाणी आणि लिंबाचा रस पीत राहिले तर आपले कोल्ड-ड्रिंक्स कोणीही पिणार नाही असा संदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिला. मग कोल्ड-ड्रिंक्स निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी एकीकडे देशी पेयांची बदनामी सुरू केली आणि कोल्ड-ड्रिंक्सचा जोरदार प्रचार केला. परिणामी भारतात, आपल्या कोकणात नारळाची असंख्य झाडे असूनही स्थानिक शेतकऱ्यांना फार लाभ मिळत नाही. वास्तविक नारळाचं पाणी कोणत्याही कोल्ड-ड्रिंक्स पेक्षा जास्त आरोग्यदायक आहे. पण नारळाचं पाणी फक्त आजारपणात पितात. गम्मत अशी कि चांगली आर्थिक स्तिथी असलेले नवं-श्रीमंत कोल्ड-ड्रिंक्स पिवून आजारी पडतात आणि आजारपणात नारळच पाणी पितात! आणि कोल्ड-ड्रिंक्स बनवणाऱ्या कंपन्यांसाठी भरपूर पाणी आहे पण शेतीसाठी पाणी नाही!!

कोल्ड-ड्रिंक्स पचवणं आतड्यांना कठीण असतं. त्यात भरलेली रसायन शोषण्याची क्षमता आतड्यांमध्ये नाही. उलट अशी रसायने आतड्यांचा नुकसान करतात. म्हणजे कोल्ड-ड्रिंक्स पिणारी व्यक्ती स्वतःला आजारी करून घेते आणि भारतीय शेतकऱ्यांनी निर्माण केलेला शेतमाल न घेवून त्याला तोट्यात ढकलते. त्याचा तोटा इतका होतो कि शेत पिकवण्यासाठी, झाड जगवण्यासाठी केलेला खर्च विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त होतो. मग शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग शिल्लक राहत नाही. जर सर्व भारतीयांनी एक दिवस कोल्ड-ड्रिंक्स न पिता फक्त भारतीय पेय प्यायली तर एका राज्यामधील शेतकऱ्यांना-बागायतदारांना एक महिन्याची कमाई करता येईल...फक्त एका दिवसात! मग त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ का येईल?

शेतमाल कुठून खरेदी करावा? मॉल मधून भाजीपाला आणि धन्य खरेदी केलं तर त्यातही भारतीयांचं नुकसान होतं. जर ग्राहकांनी नाक्यावर बसणाऱ्या भाजीवालीकडून भाजी घेतली तर त्याचे पैसे थेट तिला मिळतात. पण मॉल मधून भाजी विकली जाते तेव्हा त्याचा लाभार्थी असतो एक भांडवलदार. एक कंपनी. ही कंपनी शेतकऱ्याकडून खूप कमी किमतीत शेतमाल घेते आणि जास्त किमतीत ग्राहकाला विकते. शिवाय रस्त्यावर मिळणारी भाजी शिळी असण्याची शक्यता नसते. कारण रस्त्यावरच्या, भाजी मंडयीमधील विक्रेत्याकडे शेतमाल जास्त दिवस टिकवून ठेवणारी यंत्रणा नसते. मॉल मध्ये तशी सोय असते. त्यामुळे मॉल मधील भाजी ताजी नसू शकते. म्हणजे मॉलचा ग्राहक स्वतःचं शारीरिक आरोग्य बिघडवून घेतो आणि शेतकऱ्याचं आर्थिक आरोग्य बिघडवतो. भांडवलदार कंपन्या शेतमाल विकून प्रचंड लाभ कमावतात आणि शेतमाल पिकवणारे शेतकरी आत्महत्या करतात. हा "हिशोब" विचारात घेण्यासारखा आहे. ह्यापुढे खरेदी कराल तेव्हा ह्या हिशोबाचा विचार करा, तुम्ही केलेली खरेदी एका शेतकऱ्याचा, अन्नदात्याचा जीव वाचवू शकते. त्यासाठी खरेदी-साक्षर बना!

- निरेन आपटे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AXWXCO
Similar Posts
विसर्जन की विघटन??? अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मोठ्या धुमधडाक्यात पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हमखास दिसणारे दृश्य म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेले गणेश मूर्तींचे भग्नावशेष आणि निर्माल्य... ही स्थिती दर वर्षी असते.
वृक्षसंमेलनाध्यक्ष असलेल्या वडाच्या झाडाचं डोळ्यांत अंजन घालणारं भाषण विविध भाषांची ग्रामीण, अखिल भारतीय, जागतिक साहित्य संमेलने होतात. पर्यावरण, पाणी यासह विविध विषयांवर जागतिक संमेलनेही होतात. या संमेलनात संबंधित विषयांवर चर्चा, परिसंवाद होतात; पण बीड जिल्ह्यातल्या पालवण गावाच्या परिसरातील सह्याद्री-देवराई प्रकल्पाच्या डोंगरावर जगातले पहिले-अनोखे वृक्षसंमेलन झाले. या
भारतीय शेतीमालाच्या निर्यातवाढीला चीनमध्ये मोठी संधी ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या लेखमालेच्या आजच्या भागात पाहू या भारतीय शेतीमालाच्या, तसेच अन्य क्षेत्रांतील मालाच्या चीनमध्ये असलेल्या निर्यातसंधींबद्दल...
निसर्गाला आहे तसा ठेवण्याची ‘अभय’शपथ घ्यायलाच हवी! अधिक मासातल्या दानामागे वैज्ञानिक सूत्र, सामाजिक आशय आणि नैतिकता गुंफलेली आहे. दानामुळे संबंधित वस्तूवरील आपला हक्क समाप्त होऊन दुसऱ्याचा स्थापित होतो. घेणाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे उपकार न राहता केलेलं दान सात्त्विक समजतात. याकारणे श्रद्धा, तुष्टि, भक्ती, ज्ञान, अलोभ, क्षमा आणि सत्य या सात गुणांची रुजवात आपल्या व्यक्तिमत्त्वात होत राहाते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language